दहावी आणि बारावीचा निकाल लागू शकेल या तारखेला? HSC SSC result 2023
दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना निकालाचे वेध लागतात. मात्र यंदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.
यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आता विद्यार्थी व पालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. बारावी बोर्डाचा निकाल हा जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागु शकतो. तर दहावीचा निकाल हा जुनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो.
सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संप पुकारला होता. याच कारणामुळे दहावी - बारावीचे निकाल वेळेवर लागणार नाही की नाही याविषयी शंका होती. मात्र बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी अगदी वेगाने सुरू करण्यात आली आहे. शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपानंतर जलद गतीने पेपर तपासण्यास सुरुवात केली. बोर्डानी ही माहिती दिलेली आहे. दहावी बोर्डाचे पेपर तपासण्याची डेडलाईन ही १५ एप्रिल ठरविण्यात आली आहे.तर यापुर्वीच बारावीची पेपर तपासण्याचं काम पुर्ण केल जाईल. यानंतर निकालाचं नियोजन करण्यात येईल. कारण जुन महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातच बोर्डाला निकाल द्यायचा आहे.
यावेळी म्हणजेच मार्च २०२३ मध्ये झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत राज्यभरातील १५ लाख, ७७ हजार २५९ विद्यार्थी बसले होते.
यावेळी २०२३ च्या बारावीच्या परीक्षेला राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बसले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा