अडानींच्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून गुजरातमध्ये

मागील काही दिवसांपासून संकटांनी घेरल्या गेलेल्या अडानी समूहाने, यादरम्यान काही कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून अहमदाबादला हलविली आहेत. यात एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांच्या समावेश आहे. या कंपन्यांतील महत्वाचे विभागांचे कामकाज सध्या अहमदाबादमधून सुरू झाली आहे.
       उद्योगपती गौतम अडानी यांच्या अडानी समूहाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ६.५ अब्ज डॉलरची एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. या कंपन्यांच्या ताबा मिळाल्यानंतर त्यातील प्रमुख विभागांचे कामकाज अहमदाबादला हलवण्यात आले. त्यामुळे या कंपन्यांची प्रशासकीय कामकाज तेथुन होऊ लागले आहेत. कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी हे अहमदाबादमध्ये आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना वारंवार एका शहरातुन दुसऱ्या शहरात चकरा माराव्या लागत आहे. या त्रासाला कंटाळून अनेक जण बाहेर पडल्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

          कंपन्याचे प्रशासकीय कामकाज दोन शहरांमध्येही विभागले गेल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण ये आहे. यामुळे अनेकांनी अन्य संधीचा शोध सुरू केला आहे. एसीसी आणि अंबुजा सिमेंट या दोन्ही कंपन्यांची अधिकारी व कर्मचारी प्रतिस्पर्धी कंपन्यांकडील रिक्त जागांची विचारणा करीत असल्याचे दिसत आहे. दोन्ही कंपन्यांची मिळून सुमारे १० हजार मनुष्यबळ मुंबईत कार्यरत आहेत. एसीसी मध्ये सहा हजार तर अंबुजा सिमेंटमध्ये ६,७०० कर्मचारी आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा